मुंबई | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून पुन्हा बंड केलं आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक आमदार आणि प्रमुख नेते आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीत उभी फूट पडली आहे. अजित पवार यांनी रविवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर दुसरीकडे शरद पवार आज कराड येथे दाखल झाले असून यशवंतराव चव्हाण यांच्या स्मुर्तीस्थळाचे दर्शन घेतले तसेच राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार असा इशाराच पवारांनी दिला होता,
अशातच आता या बंडानंतर सोलापुरात शरद पवारांशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांनी थेट अजित पवारांचे फोटो भिंतीच्या कार्यालयातून खाली उतरविले आहे. तसेच अजित पवारांच्या प्रतिमेवर काळ्या पेनाने गिरवून निषेध नोंदवला आहे. शरद पवारांच्या समर्थनात आणि अजित पवारांच्या विरोधात सोलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाले आहेत तर काही ठिकाणी अजित पवारांच्या विरोधात घोषणा सुद्धा दिल्या जात आहे.
या बंडखोरीनंतर शरद पवारांनी आज कराड येथे यशवंत चव्हाण यांच्या स्मुर्तीस्थळाला भेट दिली तसेच राष्ट्रवादी पक्ष फोडणाऱ्या प्रवृत्तीना त्यांची जागा दाखवून देणार असा इशारा शरद पवार यांनी कडारमध्ये बोलताना दिला आहे. समाज विघातक प्रवृत्तीकडून महाराष्ट्रात उलथापालथ करण्याची भूमिका घेतली जात आहे. त्याला तुमचे माझे सहकारी बळी पडले आहेत. परंतु सामान्य माणूस एकवेळ उपाशी राहील, पण महाराष्ट्राची शक्ती मजबूत केल्याशिवाय राहणार नाही. तसेच या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही’, अशा शब्दात शरद पवार यांनी विश्वास व्यक्त केला आहे.