धाराशिव |
बांधकाम मजुर कामगाराचा मुलगा संदेश कल्याण माने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक झाल्याबद्दल जिल्हा उद्योग केंद्र , महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व तृतीय पंथीय यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. बांधकाम कामगाराच्या मुलाने अत्यंत कठीण परिस्थितीत हे यश मिळवल्यामुळे त्याचा सर्वत्र सत्कार करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक एन .पी.जावळीकर, व्यवस्थापक एम.डी.सुर्यवंशी, महाराष्ट्र उद्योजक्ता विकास केंद्राचे जिल्हा प्रकल्प अधिकारी पांडुरंग मोरे, खादी ग्रामोद्योग विभागाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी डी.व्ही. फताडे , कर्मचारी अहमद शेख, उद्योग निरीक्षक सातपुते साहेब, उद्योग निरीक्षक अक्षय घोडके, लेखा सहाय्यक सुमित सुरवसे ,कार्यक्रम समन्वयक किरण बनसोडे,दत्ता वाघमारे, शिवाजीराव गव्हाणे,प्रशांत मते, स्नेहल शेरखाने , लतिफा जहागीरदार, तसेच निलेश माने,नितिन बनसोडे,शितलकुमार लष्करे, व तृतीयपंथी व्यक्तीकडून शुभेच्छा देऊन सत्कार करण्यात आला.