राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून विविध मुद्दयावरून राजकारण तापत असलयाचे चित्र दिसून येत आहे अशातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट स्वातंत्रवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधावरून मालेगाव येथील सभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी य अण्णा सावरकर मुद्द्यावरून झापले होते अशातच आता मनसेने सुद्धा या प्रकरणात उडी घेत महाविकास आघाडीवर टीका केली आहे, आणीबाणी इतिहासातील चूक होती हे मविआ मान्य करेल का, अशी विचारणा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले असून, ज्या काँग्रेस नी देशामध्ये आणी बाणी लावली त्याला शिवसेनेनी पाठिंबा दिला आताचा राष्ट्रवादी त्याच काँग्रेस चा भाग होता तेच आता लोकशाही धोक्यात आहे म्हणून गळे काढतायत.ती इतिहासातील चूक होती हे माविआ मान्य करेल का ???? अशी विचारणा देशपांडे यांनी ट्विट करून विचारणा केली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्यात आल्यानंतर काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. राहुल गांधींवरील कारवाईसंदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला शिवसेना उद्धव ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे. तसेच राज्याच्या विधिमंडळात काँग्रेसकडून करण्यात आलेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेससोबत ठाकरे गटही सामील झाला होता. यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. यावर आता महाविकास आघाडी मनसेला काय प्रतिउत्तर देते हे पाहावे लागणार आहे.