Latest Marathi News

BREAKING NEWS

मनसे विरोधात मुंब्र्यात हजारोंचा जमाव, अविनाश जाधव यांना मुंब्रा बंदी

0

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माहीम आणि सांगलीतील अनधिकृत दर्ग्याच्या मुद्धा बाहेर कडल्यानंतर याचे लोन आता संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे अशातच मनसे आपापल्या विभागात असलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली होती अशातच मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्र्यातील अनधिकृत मशिदीचा मुद्धा उपस्थित करत कारवाईची मागणी ठाणे मनपाकडे केली होती मात्र दुसरीकडे या मागणीवरून मुंब्र्यातील वातावरण तापले आहे.

अशातच मनसे विरोधात काल रात्री अचानक हजारोंचा जमाव मुंब्रा पोलीस स्टेशनबाहेर जमा झाला.यावेळी अविनाश जाधव यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. रमझानच्या काळात मनसे स्थानिक नेते धार्मिक तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला. मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती नियंत्रणात आणत जमावाला पांगवले. तर दुसरीकडे मनसे नेते अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी मुंब्रा प्रवेशबंदी लागू केली.

कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये म्हणून कलम 144 चे आदेशही लागू केले. पोलिसांकडून मुंब्र्यात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिसांनी मुंब्र्यासारख्या संवेदनशील भागात शांतता आणि सलोखा राखण्याचं आवाहन केले आहे. तसेच जर कोणी शांततेचा भंग करण्याचा प्रयत्न केला तर त्याविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मनसेचे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना मुंब्रा पोलिसांनी 9 एप्रिलपर्यंत प्रवेशबंदी लागू केली अविनाश जाधव यांना तणावाच्या पार्श्वभूमीवर 9 एप्रिलपर्यंत मुंब्रा शहरात प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. तसे आदेश ठाणे पोलिसांनी काढले आहेत. अविनाश जाधव यांनी मुंब्रा शहरातील अनधिकृत मशीद, दर्गावर कारवाई केली नाहीतर त्याशेजारी हनुमानाचे मंदिर उभारण्यात येईल, असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला होता. कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ही कारवाई केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.