Latest Marathi News

BREAKING NEWS

मुंबई पोलिसांमुळेच तुम्ही मुख्यमंत्री राहिलात, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फटकारले

0

मुंबई: अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा तपास सीबीआयकडून करण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता फडणवीस यांना फटकार लगावली आहे. सुशांतच्या मृत्यूचे राजकारण केलं जात असल्याचा गंभीर आरोपही ठाकरे यांनी केला आहे.

सुशांतसिंह राजपूत प्रकरण सोडविण्यास मुंबई पोलिस पूर्णपणे सक्षम आहे. कोणाकडे काही पुरावा किंवा माहिती असल्यास त्यांनी मुंबई पोलिसांना द्यावी. पोलिस या प्रकरणाच्या तळाशी जाऊन जो कोणी दोषी असेल त्याविरूद्ध कठोर कारवाई निश्चित करतील. या प्रकरणात पोलिसांवर आरोप करू नयेत. त्यांच्यावर आरोप म्हणजे कोव्हिड योद्ध्यांवर आरोप आहे. जे कोणी असे आरोप करत आहेत मी त्यांची निंदा करतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही सुशांतच्या मृत्यूबद्दल राजकारण केल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर अविश्वास दाखविल्याचा आरोप करत मुख्यमंत्री म्हणाले, देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा या मुंबई पोलिसांमुळेच ते मुख्यमंत्री राहू शकले. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, असा टोला त्यांनी लगावला.

Leave A Reply

Your email address will not be published.