Latest Marathi News

BREAKING NEWS

चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावताना सांगितली ‘ती’ आठवण

0

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावरून राजकारण चांगलंच तापलं. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली. आता या वादात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी नाव न घेता सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

संभाजी भिडेंवर प्रतिक्रिया दरम्यान चित्रा वाघ यांनी यावेळी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. संभाजी भिडे यांनी महिलांबाबत असे वक्तव्य करणे चुकीचे आहे. महिलांनी काय घालावे आणि काय घालू नये हा त्यांचा प्रश्न असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. तसेच मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात लढा सुरूच राहणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

काय आहे सत्तार, सुळे वाद? अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर हा वाद चांगलाच पेटला. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात आली. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गंभीर दखल घेतली. त्यांनी या प्रकरणानंतर अब्दुल सत्तार यांना फोन केला. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर अब्दुल सत्तार यांनी माफी मागितली. या प्रकरणात विरोधकांकडून सत्तार यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात आली होती.

दरम्यान आता या वादात चित्रा वाघ यांनी देखील उडी घेतली आहे. त्यांनी सुप्रिया सुळे यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे. सिलेक्टिव महिलांचा अपमान हा संपूर्ण राज्यातील महिलांचा अपमान होत नाही. महविकास आघाडीच्या काळात कंगना राणावत, सप्ना पाटकर, नवनीत राणा यांचाही अपमान करण्यात आला होता, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.