Latest Marathi News

BREAKING NEWS

विठ्ठलाच्या जयघोषणासाठी आनंदकंठ कार्यक्रमाचे आयोजन ; चंद्रकांतदादा झाले विठ्ठल भक्तीत तल्लीन

0

पुणे |

आज आषाढी एकादशी निमित्त कोथरूड व्यासपीठाच्या वतीने विठ्ठल नामाच्या जयघोषासाठी आनंदकंठ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशी निमित्त एकादशी पहाट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी उपस्थिती लावली.

हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. हिंदू पंचांगानुसार एकूण 24 एकादशी आहेत, त्यापैकी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी किंवा आषाढी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीपासून चार महिने भगवान विष्णू योगनिद्रेत राहतात. उद्या देवशयनी एकादशी आहे. यावेळी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते. म्हणून आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे.

प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे, हेमंत पेंडसे, मनिषा निश्चल यांनी सादर केलेल्या संत महंतांच्या अभंग आणि भजनांनी सारं वातावरण भक्तीमय झालं होतं. या कार्यक्रमास उपस्थित चंद्रकांत दादा पाटील राहून विठ्ठल भक्तीत तल्लीन झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.