Latest Marathi News

BREAKING NEWS

कंगना रानौतला केंद्राकडून ‘Y’ सेक्युरिटी, कंगनाने मानले अमित शहांचे आभार..!!

0

मुंबई : सुशांतसिंह राजपूत कथित आत्महत्या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागलेले दिसत आहे. सुशांतसिंह राजपूतच्या कथित आत्महत्येनंतर कंगना रानौतने सातत्याने हा विषय लाऊन धरला होता. मात्र स्वतःच्या स्वार्थाची पोळी तिने सुशांतच्या प्रकरणावर भाजून घेतल्याचा आरोप अनेकांनी कंगनावर केला. अशातच कंगनाने मुंबईची तुलना पाक ओक्युपाईड काश्मीर सोबत केल्याने लोकांच्या संतापजनक प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

https://twitter.com/KanganaTeam/status/1301413968729210880?s=20

संजय राऊत यांनी प्रेस कॉन्फरन्स घेत हा मुंबईचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अपमान असल्याचे सांगितले. राम कदम यांनी कंगनाची तुलना झाशीच्या राणीसोबत केली असे राऊत यांना विचारले असता, झाशीच्या राणीचा इतका मोठा अपमान मी कधीही पाहिला नाही असं राऊत म्हणाले. कंगनाने महाराष्ट्राचा अपमान केला आहे. महाराष्ट्रातील सर्व राजकीयपक्ष महाराष्ट्रातील जनतेच्या जीवावर निवडून येतात. त्यांनी कंगनाचा विरोध करायला हवा असेही राऊत यांनी सांगितले.

शिवसैनिकांनी जागोजागी कंगनाच्या पोस्टर्स वरती चप्पल मारून निषेध व्यक्त केला. तसेच यापुढे कंगनाने मुंबईमध्ये पाय ठेवल्यास तिचे थोबाड फोडू असा थेट धमकीवजा इशाराच शिवसैनिकांनी कंगनाला दिला. यावर कंगनाने महाराष्ट्र कोणाच्या बापाची जागीर नाही आणि मीही मराठा आहे कोणाला घाबरत नाही अशा आशयाचे ट्वीट केले.

https://twitter.com/KanganaTeam/status/1301857130090127360?s=20

यावर महाराष्ट्र हा मराठी माणसाच्या बापाचाच आहे. जी बोलत आहे तिला स्वतःच्या बापाला इथे घेऊन याव लागेल असा संताप व्यक्त करत संजय राऊत यांनी कंगना रानौतविषयी अपशब्द देखील वापरले. याविषयी पुन्हा कंगनाने ट्वीटर द्वारे संजय राऊत यांना उत्तर दिले.

https://twitter.com/KanganaTeam/status/1302542975721848839?s=20

कंगनाने ९ सप्टेंबरला मुंबईत येणार आहे काय करायचंय ते करा असा इशाराच दिला. आणि मला मुंबई पोलिसांची सुरक्षा न देता, केंद्राने किंवा हरियाणा सरकारने सुरक्षा द्यावी असे निवेदन केले. यानंतर किंद्रीय गृह मंत्रालायाकडून कंगनाला ‘Y’ सुरक्षा देण्यात आली आहे. कंगनाने ट्वीट करत देशाच्या मुलीचा सन्मान केल्याबद्दल धन्यवाद अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत.

https://twitter.com/KanganaTeam/status/1302846165637971969?s=20

Leave A Reply

Your email address will not be published.