Latest Marathi News

BREAKING NEWS

भाजपच्या कपटी राजकारणाला संजय राऊत घाबरणारे नाहीत

0

 

शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध ईडीने सूडबुद्धीने केलेल्या कारवाईवर गुरुवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी जोरदार हल्लाबोल केला. संजय राऊत हे भाजपच्या कपटी राजकारणाला घाबरत नाहीत.ते याचा धाडसाने सामना करतात. त्यामुळेच त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना टार्गेट केले जात आहे, अशा शब्दांत ट्विट करीत प्रियंका यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.

कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने शिवसेना नेते- खासदार संजय राऊत यांना 1 ऑगस्ट रोजी अटक केली. त्यानंतर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना गुरुवारी समन्स बजावले. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी ट्विट करून ईडीच्या कारवाईचा व भाजपच्या सूडाच्या राजकारणाचा समाचार घेतला.

 

धमकी, छळ आणि कपटी कारस्थान करून आणि लोकशाही मूल्ये पायदळी तुडवून सत्ता काबीज करणे हा भाजपचा एकमेव अजेंडा आहे. याच अजेंडय़ातून सध्या संजय राऊत व त्यांच्या कुटुंबीयांना टार्गेट केले जात आहे. भीती आणि धमकी ही भ्याड लोकांची शस्त्र्ाs आहेत. हे भ्याड लोक सत्याच्या प्रहारापुढे टिकणार नाहीत, अशा शब्दांत ट्विट करीत प्रियंका गांधी-वढेरा यांनी शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांना पाठिंबा दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.