Latest Marathi News

BREAKING NEWS

जयंत पटलांसारखी माणस आपण तुडवत तुडवत इथपर्यंत आलोय

0

 

पुन्हा एकदा भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.
जयंत पाटलांसारखी माणसं तुडवत-तुडवत आपण इथपर्यंत आलोय, अशा शब्दात आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांची खिल्ली उडवली आहे.आटपाडी पोलीस ठाण्यावर पोलिसांच्या विरोधात काढलेल्या मोर्चामध्ये पोलीस निरीक्षकाच्या कारभाराचे वाभाडे देखील आमदार पडळकरांनी काढले

आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यातलं राजकीय शत्रुत्व हे सगळ्यांनाच ज्ञात आहे.आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडून अनेक वेळा जयंत पाटलांच्या वर जहरी टीका करण्यात आली आहे.अशीच टीका पुन्हा एकदा आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी मंत्री जयंत पाटलांच्यावर केली आहे. सांगली जिल्ह्यातलं पोलीस दल जयंत पाटलांच्या घरात पाणी भरतय, अशा शब्दात पडळकर यांनी आटपाडी येथील मोर्चामध्ये टीका केली आहे.

त्याचबरोबर आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाचा बाप जयंत पाटील होता,पण त्यांना माहिती नाही,जयंत पाटलांच्या सारख्या माणसांना तुडवत-तुडवत इथपर्यंत आलोय,अश्या शब्दात पडळकरांनी आपला संताप व्यक्त केला. राज्यात आता भाजपा सत्तेत आहे.असे असताना देखील आमदार गोपीचंद पडळकर यांना थेट पोलिसांच्या विरोधात मोर्चा काढावा लागतोय,याचा खुलासा करताना ही टीका केली आहे.आटपाडी तालुक्यातल्या अवैध सावकारीला राजकीय वरदहस्त असल्याने पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप करत थेट पोलीस ठाण्यावर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धडक देण्यात आली.यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर निशाणा साधला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.