Latest Marathi News

BREAKING NEWS

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी ठोस निर्णय घेऊन परत यावं राऊतांनी पुन्हा डिवचलं 

0

 

 

मुख्यमंत्री हे शिवसेनेचे नाहीत तर भाजपाचे आहेत, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. राऊत सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते.’महाराष्ट्रात मुख्यमंत्री भाजपाचे आहेत. कर्नाटकात भाजपाचे मुख्यमंत्री आहेत. दिल्लीत भाजपाची सत्ता आहे. बेळगावसह सीमाभागाचा प्रश्व सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

 

या भागात मराठी भाषिकांवर अन्याय होत असून न्यायालयाचा निकाल येईपर्यंत तो भाग केंद्रशासित करावा, अशी भूमिका महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  यांच्याकडे मांडायला हवी. तो निर्णय घेऊन त्यांनी महाराष्ट्रात यायला हवं,’ अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार गेल्यापासून सीमाभागातील मराठी भाषिकांना त्रास सहन करावा लागतोय, अशी आपल्याला माहिती बेळगावच्या शिष्टमंडळानं दिली आहे, असे राऊत यांनी सांगितले. हे मुख्यमंंत्री शिवसेनेचे आहेत, तर ते मंत्रिमंडळ ठरवण्यासाठी दिल्लीत का गेले आहेत. शिवसेने हायकमांड मुंबईमध्ये आहेत. असे राऊत म्हणाले.

 

‘महाराष्ट्राचे तुकडे, मुंबईचे तुकडे, महाराष्ट्रातील उद्योग राज्याच्या बाहेर जाण्याची परवानगी सरकार देणार का?’ असा सवाल राऊत यांनी विचारला आहे. ‘पूर्वाश्रमीचे शिवसेना नेते आणि आता भाजपाचे मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी याकडं गांभीर्यानं पाहावं’ असा टोला राऊत यांनी लगावला. ‘द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असेल.या विषयावर दिल्लीत वेगळी बैठक नाही तर विचारांचं आदान-प्रदान झालं असेल, अलिकडं मध्यरात्री विचारांचं आदान-प्रदान होतं.’ असंही राऊत म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.