Latest Marathi News

BREAKING NEWS

“उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं” खासदार कृपाल तुमाने यांची मागणी

0

 

पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं. योग्य निर्णय व्हावा. त्यांनी एकत्र यायलाच हवं जेणे करून शिवसैनिकांमधील संभ्रम दूर होईल. आपण शिवसेना सोडलेली नाही, आपण शिवसैनिकच असलेयाचं एकनाथ शिंदे यांनी सांगतलं आहे. त्यामुळे त्यांनी एकत्र यावं “, असं शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे यांनी म्हटलं आहे.

खासदार कृपाल तुमाणे यांची पुढची भूमिका काय असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. शिवाय तुम्ही शिंदे गटात जाणार का या प्रश्नावर त्यांनी नो कमेंट्स असं म्हणत उत्तर देणं टाळलं. दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीच्या बातमीवरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे आमदार पाठोपाठ आता खासदार सुद्धा शिंदे गटात सामील होणार असे संकेत कृपाल तुमाने यांनी दिले आहे.

“उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यावं. योग्य निर्णय व्हावा. त्यांनी एकत्र यायलाच हवं जेणे करून शिवसैनिकांमधील संभ्रम दूर होईल. आपण शिवसेना सोडलेली नाही, आपण शिवसैनिकच असलेयाचं एकनाथ शिंदे यांनी सांगतलं आहे. त्यामुळे त्यांनी एकत्र यावं “, असं कृपाल तुमाणे यांनी म्हटलं आहे. यावर आता शिवसेना काय प्रतिक्रिया देते हे पाहावे लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.