Latest Marathi News

BREAKING NEWS

भाजप अन् शिंदे गटात बिनसलं, खासदाराने व्यक्त केली जाहीरपणे खंत

0

राज्यात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाची साथ सोडून भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन केले मात्र दुसरीकडे सरकार स्थापन होऊन शिंदे गट आणि भाजपात स्थानिक पातळीवर वाद होत असल्याचे चित्र अनेकदा समोर आले होते. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची मुलगी संजना जाधव यांनी थेट शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या विरोधातच मोर्चा काढला होता हे प्रकरण चांगलंच गाजलं होत. अशातच आता भाजप खासदाराने शिंदे सरकारच्या मंत्र्याबाबत जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे युतीतील नाराजीनाट्य समोर आले आहे. भाजप खासदारने शिवसेनेच्या मंत्र्यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात पाणीपुरवठा योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमांचा धडाका पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लावला आहे. मात्र या कार्यक्रमांना जिल्ह्यातील भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन व खासदारांना बोलवले जात नाही. भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी मंत्री गुलाबराव पाटलांविषयी नाराजी व्यक्त केली आहे.योजनेत केंद्राचा वाटाजल जीवन मिशन योजना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आली आहे.

या योजनेसाठी केंद्राने बजेट दिले आहे. त्यामुळे केंद्राचा प्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉलप्रमाणे खासदारांना व जिल्ह्यातील भाजप नेते गिरीश महाजन यांना बोलवल्या समाजामध्ये चांगलं चित्र येईल, अशी प्रतिक्रिया खासदार उन्मेष पाटील यांनी दिली आहे. जलजीवन मिशन योजनेचे कार्यक्रम सर्वसमावेशक व्हावे अशी अपेक्षा आहे. शिवसेनेवर होत असलेले खोके, ओके वगैरे आरोप दूर करायचे असेल व खरोखर चांगलं काम दाखवावे लागणार आहे. कामाच्या माध्यमातून आरोप दूर करता येईल, असे उन्मेष पाटील यांनी गुलाबराव पाटील यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.