Latest Marathi News

BREAKING NEWS

भामट्यांनी थेट नकली पोलीस स्टेशन उभारलं; ५०० रुपये रोजंदारी देऊन अधिकारी आणि हवालदार

0

 

नकली पोलिसांनी फसवल्याच्या अनेक बातम्या आपण वाचल्या असतील. परंतु बिहारमध्ये एका गावामध्ये भामट्यांनी थेट नकली पोलीस स्टेशनच उभारल्याने खळबळ उडाली. कर शहरातील एका गेस्ट हाऊसमध्ये हे पोलीस स्टेशन थाटण्यात आले होते. पोलिसांनी धाड टाकून याचा भांडाफोड केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून पोलीस शुद्ध चक्रावले आहे.

खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे एके ठिकाणी छापेमारी करून आम्ही परतत असताना कर शहरातील एका गेस्ट हाऊससमोर एक अनोळखी महिला आणि तरुण पोलीस वर्दीमध्ये दिसले. शंका आल्याने आम्ही त्यांची चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेस्ट हाऊसमध्ये भामट्यांनी चक्क नकली पोलीस स्टेशन थाटले होते. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

अटकेतील एक महिला पोलिसाच्या वर्दीमध्ये होती आणि तिच्याजवळ गावठी पिस्तूलही होते. अनिता देवी असे तिचे नाव असून आकाश कुमार नावाच्या आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. हा व्यक्ती स्वत:ला नकली पोलीस स्टेशनचा अधिकारी सांगत होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. तसेच अन्य लोकांना 500 रुपये रोजंदारी देऊन हवालदार बनवण्यात आले होते.

पोलीस चौकशीमध्ये अनिता देवी हिने ती बांका जिल्ह्यातील फुल्लीडुमर जवळील दुधघटिया येथील रहिवासी असल्याचे सांगितले. फुल्लीडुमर येथील भोला यादव नावाच्या एका व्यक्तीने तिला नकली पोलीस बनवून येथे तैनात केले होते. जिथे जिथे सरकारी घरे बांधली गेली, तिथे ती चौकशी करायला जायची. तर आकाशने भोला यादव याने ७० हजार रुपये देऊन आपल्याला नकली पोलीस बनवल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.