Latest Marathi News

BREAKING NEWS

भाजपा वाल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा बदनामीची सुपारी घेतली आहे

0

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची विधाने नवे राजकीय भूकंप घडवून आणण्याचे काम करत आहेत. कोश्यारींच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होत असून तरी भाजपच्या अडचणीत वाढ होत आहे. प्रत्येक वादग्रस्त विधान भाजपकडून स्पष्टीकरणाची मागणी होत आहे. या स्थितीत पक्ष मध्येच अडकला आहे. भाजप या नेत्यांचा उघडपणे विरोध करू शकत नाही किंवा उघडपणे समर्थन करू शकत नाही. यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आणखी भर टाकली दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ऐकेरी उल्लेख केला आहे. सोशल मीडियावर त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे.

अमोल मिटकरी म्हणाले, “भाजपच्या नेत्यांनी शेण खाण्याची परंपरा कायम ठेवली. आत्ता परत एकदा भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी शेण खाल्ले. छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘शिवाजी’ असा एकेरी उल्लेख केला. भाजपवाल्यांनी शिवरायांच्या अपमानाची सुपारी घेतली, याचा आणखी एक पुरावा. दानवेंवर कारवाई करा.”

यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, मंगल प्रभात लोढा, संजय गायकवाड, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्यांच्यावर अजून कारवाई झाली नाही. तर रावसाहेब दानवेंचे नवीन विधान समोर आले आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच अडचण झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.