Latest Marathi News

BREAKING NEWS

रोहित कोहलीची टी-२० मधून कायमची सुट्टी?

0

टीम इंडियाचे आता विविध संघांसोबत सामन्यांच्या मालिका कायम सुरु असणार आहेत. भारताच्या आगामी मालिकांचे वेळापत्रकही फारच व्यस्त असणार आहे. बांगलादेशनंतर टीम इंडिया घरच्या मैदानावर श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी-२० मालिका खेळणार आहे.

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात भारतीय भूमीवर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. नवी निवड समिती श्रीलंकेविरुद्धच्या या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या या मर्यादित षटकांच्या मालिकेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे.

रोहित-कोहलीला टी-२० संघातून वगळणार?
हार्दिक पांड्याला भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्त्व सोपवले गेले. त्यामुळे आता आगामी टी-२० सामन्यांमध्ये रोहित आणि कोहलीसारख्या सिनियर खेळाडूंना वगळण्यात येऊ शकते. इतकेच नव्हे तर पुढील श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टी-२० संघाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे दिली जाऊ शकते.
इनसाईड स्पोर्ट्सनुसार, डिसेंबरमध्ये नियुक्त करण्यात येणारी नवीन निवड समिती श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी आणि त्याच टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक आणि केएल राहुल यांना टी-२० संघातून वगळले जाऊ शकते.

टीम इंडियाचा नवा कर्णधार

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्टला एक मोठी माहिती दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, ‘भारतीय क्रिकेट संघाला आता टी-२० फॉरमॅटमध्ये युवा खेळाडूंसोबत पुढे जायचे आहे. अशा परिस्थितीत काही मोठ्या खेळाडूंना टी-२० संघातून बाहेर राहावे लागू शकते. अधिकाऱ्याने सांगितले की, “बीसीसीआयने रोहित शर्मा आणि विराट कोहलीला याबाबत आधीच माहिती दिली होती.” बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने संकेत दिले की, हार्दिक पांड्या श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करेल.

Leave A Reply

Your email address will not be published.