अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या करुणा शर्मा यांच्या गाडीवर बुधवारी मध्यरात्री त्यांच्या घराजवळ काहीजणांनी हल्ला केला. करुणा यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली, तसेच त्यांच्या कारचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करुणा शर्मा यांच्या गाडीवर बुधवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. तसेच दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.करुणा शर्मा या शहरातील कॅनॉल रोडवरील उत्तमनगर भागात राहतात सद ठिकाणी हा हल्ला झाल्याचे त्यांनी म्हंटले आहे.
सविस्तर घडलेली घटना असे की, बुधवारी रात्री करुणा शर्मा गाडीतून पीए अजयकुमार देडे यांच्यासह त्या मेडीकलवर थायरॉईडचे औषध आणण्यासाठी निघाल्या होत्या. घरापासून काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना लक्षात आले की, गाडीचा टायर पंक्चर आहे. त्यामुळे परत घरी जाण्यासाठी निघाल्या असता तीन अनोळखी व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यातील एकाने गाडीच्या समोरील काचेवर दगड मारला, यात काच फुटली. तर अन्य दोघांनी दोन्ही बाजुचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.
आठवले यांना शिर्डीतून पाठिंबा देणार का? विखे पाटील म्हणतायत की