मुंबई । बारामतीमध्ये पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी मोठे विधान केले होते. अजित पवार हे आमचेचे नेते आहेत, राष्ट्रवादीत फुट नसल्याचे शरद पवारांनी विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर लगेच त्याला पक्षात फूट पडली असे म्हणू शकत नाही, असे शरद पवारांनी म्हटले आहे.
शरद पवारांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. विशेष करून महाविकास आघाडीतील नेते यावर सूचक विधान करत आहे आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगासाठी तसेच पक्ष, पक्षाची घटना आणि नेतृत्व वाचवण्यासाठी शरद पवारांनी वक्तव्य केले असावे, असे माझे व्यक्तिगत मत आहे.
पुढे ते म्हणाले की, शरद पवार यांच्या विधानामुळे नेतृत्वात नाही, पण कार्यकर्ते आणि जनतेत संभ्रम होत असतो. हे सत्य आहे. ते नाकारता येत नाही. शरद पवार यांच्या विधानाने संभ्रम निर्माण होतोय. मला जाहीरपणे काही वक्तव्य करता येणार नाही.मात्र आमच्यामध्ये, शिवसेनेत संभ्रम निर्माण होतो. स्पष्ट भूमिका समोर यायला पाहिजे असे कार्यकर्त्यांना वाटते. जे लोक राष्ट्रवादीत गद्दारी करुन भाजपसोबत जातात आणि हे त्यांना नेता मानतात, असे अंबादास दानवेंनी म्हटले आहे.
मोठी बातमी । बीडमध्ये करूणा शर्मा यांच्या गाडीवर प्राणघातक हल्ला