२०२४ च्या लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे तर दुसरीकडे भाजपा मित्रपक्ष सुद्धा लोकसभा निवडणुकीसाठी आवडत्या मतदार संघासाठी फिल्डिंग लावत आहेत अशातच भाजपा मित्रपक्ष रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी सुद्धा शिर्डी मतदार संघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती या संदर्भात खासदार सुजय विखे पाटील यांनी सूचक विधान केले आहे
याबाबत भाजप खासदार सुजय विखे यांनी बोलताना म्हटलं की, जो कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावेल त्याचा प्रचार आम्ही करू. आम्हाला कोणाचीही अडचण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जो आदेश देतील तोच खासदार होईल असं विखे यांनी म्हटलं आहे.रामदास आठवले यांनी अनेकदा शिर्डी मतदारसंघामधून उभं राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते यापूर्वी देखील एकदा शिर्डी मतदारसंघातून उभे राहिले होते.
मात्र त्यावेळी त्यांना मोठ्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र सध्या राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडी पहाता यावेळी चित्र वेगळं असणार आहे. या मतदारसंघात अटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये भाजप या मतदारसंघातून आपल्या मित्रपक्ष असलेल्या आरपीआयला पाठिंबा देणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार असून या मतदार संघात शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे सध्या खासदार आहेत त्यामुळे ही .जागा शिंदे गट आठवलेंसाठी सोडणार का हे पाहावे लागणार आहे.
अरे देवाला तरी सोडा ! देवाच्या दानपेटीती १०० कोटींचा चेक; बँकेत टाकताच….
‘माझ्या जीवाला धोका’ आमदार प्रसाद लाड यांचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र