Latest Marathi News

BREAKING NEWS

बावनकुळे तुमचं तिकीट का कापलं, तुम्ही वीज खात्यात काय केलं, ते दिल्ली पर्यंत गेलं म्हणून…

0

रोशनी मोरे यांना झालेल्या मारहाणीनंतर पत्रकार परिषदेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फडतूस असा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख केला त्यांनांतर संपूर्ण भाजपा उद्धव ठाकरेंवर तुटून पडली अशातच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सुद्धा उद्धव ठाकरेंना इशारा दिला होता आता या टीकेचा खासदार संजय राऊत यांनी चांगलंच समाचार घेत चंद्रशेकर बावनकुळे यांच्यासह भाजपाला इशारा दिला आहे.

राऊत म्हणाले बावनकुळे आम्हाला तुम्ही धमक्या देता. इडी आणि सीबीआय तुमचे बॉडीगार्ड आहेत. कोण बावनकुळे तुमचं तिकीट का कापलं? तुम्हाला आणि तुमच्या पत्नीला तिकिट का दिलं नाही. तुम्ही वीज खात्यात काय केलं होतं. ते दिल्लीपर्यंत आलं होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवू नये. तुम्ही सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नाहीत, असा इशारा राऊत यांनी दिला.

पुढे ते म्हणाले की. फडणवीस गृहमंत्री झाल्यानं महाराष्ट्राची अडचण झाली आहे. ईडी, सीबीआय आहेत म्हणून यांची जीभ तुरुतुरु चालते आहे. ‘सीबीआय आणि ईडी म्हणजे सरकारचे बॉडीगार्ड झाले आहेत, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.आम्ही कुठं बोललो झुका म्हणून. हे सगळे झुके आहेत. डॉक्टर मिंधे यांच्या टोळीने आपच्या एका महिलेवर हल्ला केला. त्यांच्या भेटीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गेले होते. त्या महिलेवर हल्ला झाला. या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने नपुसंक म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी सौम्य शब्दात टीका केली आहे. फडतूस म्हटले. मात्र, गृहमंत्री झाल्याची आम्हाला नाही तर महाराष्ट्राला अडचण आहे. भिजलेली काडतूस आहेत. इडी सीबीआय बाजूला ठेवून या, मग बघा. तुम्ही गृहमंत्री झाल्यानंतर मंत्रालयात तीन लोकांनी आत्महत्या केल्या. तुम्ही काय करत आहात, असा थेट सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.