Latest Marathi News

BREAKING NEWS

“आम्ही सारे सावरकर, सावरकर गौरव यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद…”

0

सोलापूर |

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील कामगिरीचे स्मरण करुन देण्याबरोबरच नव्या सावरकरांच्या विचाराची ओळख करुन देण्यासाठी शहर दक्षिण मतदार संघात भाजपाच्यावतीने आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. सावरकरप्रेमी मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले होते. स्वातंत्र्य वीर सावरकर जी का अपमान नहीं सहेगा हिंदुस्थान”,सावरकर जी के सन्मान मैं,भाजपा मैदान मैं, आम्ही सारे सावरकर या घोषणांनी भाजप कार्यकर्त्यांनी विजापूर रोड परिसर दणाणून सोडला होता.

या गौरव यात्रेत सोलापूरचे लोकसभा खासदार डॉ जयसिद्धेश्र्वर महास्वामी, दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मनीष देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती. राहुल गांधी यांच्याकडून वारंवार होत असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अपमानाविरोधात भाजपच्या वतीने सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आह. रविवारी शहर मध्य मतदारसंघातून गौरव यात्रा काढण्यात आली होती तर मंगळवारी शहर दक्षिण मतदार संघातून ही गौरव यात्रा काढण्यात आली.
स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण या गौरव यात्रेत करण्यात आले

Leave A Reply

Your email address will not be published.