नवी दिल्ली |
‘देशाला भ्रष्टाचारमुक्त करणे ही केंद्रीय तपास संस्थेची मुख्य जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी सीबीआयला थांबण्याची गरज नाही,’ असे ठाम प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
‘भ्रष्टाचाराशी लढण्यासाठी आमच्या सरकारकडे राजकीय इच्छाशक्तीचा मुळीच अभाव नाही,’ असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. सीबीआयच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन करताना पंतप्रधान बोलत होते.
‘सरकारने काळा पैसा, बेनामी मालमत्तेविरुद्ध मिशन मोडमध्ये कारवाई सुरू केली. भ्रष्ट लोकांव्यतिरिक्त आम्ही भ्रष्टाचाराच्या कारणांवरही लढा देत आहोत. विकसित भारताची निर्मिती व्यावसायिक आणि कार्यक्षम संस्थांशिवाय शक्य नाही, त्यामुळे सीबीआयवर मोठी जबाबदारी आहे.