Latest Marathi News

BREAKING NEWS

बंडखोरीनंतर पहिल्यांदाच येणार एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे समोरा-समोर

0

हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून आजचा दिवस कसा असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज विधान परिषद सदस्य म्हणून विधान परिषदेत विरोधी बाकांवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या समोर त्यांचेच जूने सहकारी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून सत्ताधारी बाकांवर उपस्थित असतील. त्यामुळे विधान परिषद सभागृहात ठाकरे विरुद्ध शिंदे गटात आरोप -प्रत्यारोप होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे आज विधान परिषदेत उपस्थित राहणार असून सभागृहात त्यांचे भाषणही होणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच ठाकरे सभागृहात भाषण देतील. त्यामुळे ते सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारचा कसा समाचार घेणार हे पाहावे लागेल. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले त्यांचेचे जूने सहकारी आमदार एकनाथ खडसे यांच्यातही खडाजंगी पाहायला मिळेल.

हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही विरोधक सरकारच्या विरोधात अनेक मुद्द्यावर आवाज उठवणार आहेत. सीमा वादाचा प्रश्न ,शेतकऱ्यांना न मिळालेली मदत या सर्व मुद्द्यांवरती विधानभवनाच्या पायऱ्यावरती विरोधक साडेदहा वाजता आंदोलन करतील आणि सभागृहातही आक्रमक राहणार आहेत.सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर तीनही पक्षांची भूमिका कशी असावी या संदर्भात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची बैठक पार पडली.श्रद्धा वालकर प्रकरणी विधानसभेत लक्षवेधी लावण्यात आलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.