Latest Marathi News

BREAKING NEWS

महाविकास आघाडीच्या सदस्याची बैठक ; कामकाजासंदर्भात व्यूहरचना

0

नागपूर |

नागपूर येथील विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (मंगळवार, दि. २० डिसेंबर २०२२) सकाळी कामकाज सुरु होण्यापूर्वी, महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते आणि विधीमंडळ सदस्यांच्या बैठकीत, विधीमंडळाच्या कामकाजासंदर्भात व्यूहरचना ठरवण्यात आली तसेच सदस्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, एकनाथराव खडसे, शिवसेनेचे आदित्य ठाकरे, अनिल परब आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.