भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट संकेत शिवसेनेचे बंडखोर नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे भाजपा-शिंदे युतीचे सरकार राज्यात स्थापन करण्याच्या हालचाली एक-दोन दिवसात गतिमान होतील, असे मानले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे काही आमदार आसाममधील गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहत आहेत.
या सर्व बंडखोरांना महाराष्ट्रात परतण्याचे आवाहन करण्यासाठी सातारातील उपजिल्हाप्रमुख संजय भोसले रॅडिसन ब्लू हॉटेलजवळ गेले होते. ‘मातोश्रीवर परत चला’ असं फलकही त्यांनी घेतलं होतं. मात्र त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे संवेदनशील क्षेत्र आहे. त्यामुळे कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
शिवसेनेकडून १२ आमदारांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निलंबन करण्याचा अधिकारच नाही. कारण आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे आणि ते संख्याबळ सिद्ध करुन दाखवण्याची आमची ताकद आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले त्यामुळे येणाऱ्या दिवसात महाविकास आघाडी टिकणार किशिन्दे-भाजपा सरकार स्थापन होणार हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.