मागच्या काही दिवसांपासून शँडे गट आणि शिवसेना यांच्यात मोठा राजकीय सत्तासंघर्ष सुरु होता. मात्र हा सत्तासंघर्ष संपला आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला. शिंदे-भाजप सरकारने काल बहुमताचा प्रस्ताव 164 मते मिळवत जिंकला आहे. तर महाविकास आघाडीच्या शिवसेना उमेदवाराला केवळ 99 मते मिळाली. यानंतर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विजयाची घोषणा झाली. यानंतर आज सामानाच्या अग्रलेखातून शिंदे सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.
अग्रलेखात म्हंटल आहे कि, सत्तेचा अमरपट्टा कुणीच सोबत घेऊन आलेले नाही. शिंदे त्यांचे सरकारही त्याच पद्धतीचे आहे. सुरत, गुवाहाटी, गोव्यातून ते सरकार एखाद्या सांगाड्यासारखे भाजपच्या रुग्णवाहिकेतूनच अवतरले. बहुमत चाचणी जिंकल्यामुळे पुढचे सहा महिने या सरकारला धोका नाही असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत. शिंदेंचे बंड म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही व त्यांच्यासोबत जे बंडखोर गुळाच्या ढेपेस चिकटले ते म्हणजे कोणी क्रांतिवीर नाहीत.
बंडखोरांचे बोलणे व डोलणे काही दिवसांचे आहे. सत्ता व संपत्ती यासाठी झालेले बंड ऐतिहासिक व तात्त्विक नसते. त्यास नीतिमत्तेचा कितीही मुलामा दिला तरी त्या बंडाला तेज प्राप्त होत नाही! भाजपने घडवून आणलेल्या बंडाची तीच स्थिती आहे. बहुमत जिंकले. सहा महिने सत्ता भोगा. हाच सगळ्याचा गोषवारा आहे! असं देखील अग्रलेखात म्हंटल आहे.