तुकाराम मुंढे हे पुन्हा अॅक्शन मोडवर आलेले पाहायला मिळत आहेत. मुंढे यांनी आयुक्त आरोग्य सेवा तसेच संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा पदभार घेतल्यानंतर कारवाईला सुरुवात केली आहे. ऐन दिवाळीमध्ये तुकाराम मुंढे मराठवाडा दौरा करत असल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची झोप उडाली आहे. रुग्णालयात तुकाराम मुंढे यांची अचानक एंट्री झाल्यामुळे रुग्णालय प्रशासनाची मात्र चांगलीच धांदल उडाली होती. काय घडले नेमके?
राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त तुकाराम मुंढे हे बीड जिल्ह्यात आपल्या गावी दिवाळी निमित्त आले होते. मात्र कर्तव्यदक्षता दाखवत तुकाराम मुंढे यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयाला सायंकाळच्या वेळी अचानक भेट दिली आणि तिथल्या आरोग्य यंत्रणेची झोप उडाली. यावेळी त्यांनी कामात कुचराई करणाऱ्या आणि रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगलंच झोपलं आहे. तसेच सायंकाळच्या वेळेस त्यांनी बीडच्या जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्याने वेगवेगळ्या वॉर्डमध्ये जाऊन तुकाराम मुंडे यांनी रुग्णांची विचारपूसही केली.
तुकाराम मुंढे हे अति दक्षता विभागात गेले असता त्या ठिकाणी औषधाचे रेकॉर्ड त्यांना आढळून आलं नाही, यावेळी त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना काम जमत नसेल तर नोकरी सोडून द्या अशा शब्दात कान उघडनी केली आहे. जिल्हा रुग्णालयात अचानक आलेल्या तुकाराम मुंढे यांच्यामुळे रुग्णालय प्रशासनाची मात्र चांगलीच धांदल उडाली होती, तर यावेळी अनेक डॉक्टरांना व्यवस्थित उत्तर देखील देता आली नाहीत, त्यामुळे देखील तुकाराम मुंडे चांगलेच संतापले होते.