Latest Marathi News

BREAKING NEWS

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘हे’ घेतले महत्त्वापूर्ण…

0

मुंबई |

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे आयोजित बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेसह मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते.

संक्षिप्त मंत्रिमंडळनिर्णय :

✅ वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव

✅ मुंबई ट्रान्स हार्बर लिंक मार्गाला ‘अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव

✅ राज्यात ७०० ठिकाणी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’; २१० कोटी रुपयांना मान्यता

✅ भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ

✅ महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित राबविणार. २ कोटी कार्ड वाटणार; आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.

✅ संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ

✅ आता असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ. करोडो कामगारांना लाभ मिळणार

✅ नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश

✅ मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर ( औरंगाबाद) येथे उभारणार. १०० कोटींच्या खर्चास मान्यता.

✅ पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ कि.मी.च्या नद्यांमधील गाळ काढणार

✅ मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भुखंड

✅ भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण

✅ मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये

✅ राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यायांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र

✅ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन; पायाभूत सुविधांसाठी सिडबीशी करार

✅ बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित

✅ जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी खर्चास मान्यता

✅ राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी खर्चास मान्यता

✅ बुलडाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय

✅ दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविणार

✅ दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

✅ देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता

✅ चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट

✅ सर जे. जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ

✅ गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता

✅ ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ

✅ पाकिस्तानने पकडलेल्या मासेमारी करणाऱ्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार

✅ पर्यटन उपविभागासाठी उप सचिव

Leave A Reply

Your email address will not be published.