कोल्हापूर | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण बुधवारी यांनी देशाचे अर्थसंकल्प सादर केले. या अर्थसंकल्पावर सत्ताधारी आणि विरोधकांनी आपापले माता मांडले होते तर विरोधकांनी यावर ताशोरे ओढले होते तर सत्ताधाऱ्यांनी तोंडभरून कौतुक अशातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी यावर टीका केली आहे. अर्थसंकल्पावर मी समाधानी नाही, असे म्हणत थेट केंद्रातील मोदी सरकारवर त्यांनी निशाणा साधला.
“अर्थसंकल्पात सेंद्रिय शेतीचे तुणतुणे वाजवण्यात आले. रासायनिक खताच्या वाढत्या किमती नियंत्रणात कशा आणणार, याचे उत्तर बजेटमध्ये नाही. डेअरी आणि पोल्ट्री व्यवसायासाठी तोकडी तरतूद करण्यात आली आहे. या देशातील केवळ ४% लोकांनाच हमीभाव मिळतो. शेतीसाठी सरकार काय करत आहे? ४ लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्याने तुमचे समाधान झाले नाही का? भरड धान्य शेतकऱ्याला परवडत नाही.
तसेच उसाचे वजन करणारे काटे रद्द करण्याची मागणी होत नाही. प्रत्यक्ष डिजिटलायझेशन होणार का? कापूस उत्पादकांसाठी नवनवीन बियाणे आणि संशोधन करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल साठवून ठेवण्यासाठी गोडाऊन उपलब्ध नाही. किमान हमीभाव कायदा करावा तरच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील.” असे ते म्हणाले.