टीव्ही मालिकेमुळे साधनाच्या रुपात घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सारा खान पुन्हा चर्चेत आली आहे. सारा गेल्या अनेक वर्षांपासून पडद्यावरुन गायब होती. दरम्यान आता सारा खान तिच्या कमबॅकमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच ‘1990’ या चित्रपटातून पुनरागमन करणारआहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शाहिद काझमी करत आहेत.या चित्रपटात सारासोबत अर्जुन मन्हास आणि मीर सरवर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
साराच्या व्यावसायिक आयुष्यानंतर आता तिच्या खाजगी आयुष्यासंबंधित एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री बॉयफ्रेंड शंतनू राजेसोबत लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच वृत्त आहे. सारा खानचा बॉयफ्रेंड हा एक मराठमोळा मुलगा आहे.शंतनू राजे असं त्याच नाव आहे. शंतनू राजे हा व्यवसायाने पायलट असून तो एका रेस्टॉरंटचा मालक आहे. सारा आणि शंतनू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते दोघेही सतत एकमेकांसोबतचे रोमँटिक आणि मजेशीर व्हिडीओ आणि फोटो शेअर करत असतात.
सारा खान दुस-यांदा वधू बनणार आहे. हे साराचं दुसरं लग्न आहे. यापूर्वी अभिनेत्रीने 2010 मध्ये ‘बिग बॉस 4’ च्या घरात स्पर्धक अभिनेता अली मर्चंटसोबत लग्न केलं होतं. त्याकाळात या लग्नाची प्रचंड चर्चा झाली होती. या दोघांचे चाहते त्यांच्या लग्नाने फारच खुश होते. परंतु हे लग्न फक्त दोन महिने टिकले. घरातून बाहेर पडल्यानंतर सारा-अली मर्चंटचा घटस्फोट झाला होता. त्यांनतर गेल्यावर्षी सारा खान ‘लॉकअप’ मध्ये सहभागी झाली होती. विशेष म्हणजे या शोमध्ये तिचा एक्स पती अलीसुद्धा होता. या शोमुळे ते दोघे पुन्हा चर्चेत आले होते.