Latest Marathi News

BREAKING NEWS

पोलिस उपनिरीक्षकाविरोधात पत्नीची ठाण्यामध्ये तक्रार

0

शारिरीक व मानसिक त्रास देणाऱ्या पोलिस उपनिरीक्षक पतीसह सासरकडील मंडळींवर गुन्हे नोंदवण्यात यावे, अशी मागणी पोलिस उपनिरीक्षकाच्या पत्नीने तक्रारीतून पोलिसांकडे केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून पोलिस वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले आहे.

या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, जिल्ह्यातील एका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक यांच्या पत्नीने काही दिवसापूर्वी पती विरोधात महिला सुरक्षा कक्षात तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांना समुपदेशन करण्यासाठी तारीखही देण्यात आली. मात्र पोलिस उपनिरीक्षक तारखेवर हजर झाले नाही. पत्नीला पती पोलिस उपनिरीक्षकाकडे नांदवायला जायचे असून ते नांदवायला तयार नसल्याचा आरोप पत्नीने तक्रारीत केला आहे. तसेच घरात वादविवाद करून मारहाण, शिविगाळ करीत असून शारिरीक व मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक पती व सासरच्या मंडळींवर गुन्हे नोंद करण्याची मागणी देखील तक्रारीतून करण्यात आली आहे. या तक्रारीमुळे एकच खळबळ उडाली असून पोलिस वर्तुळात विविध चर्चेला उधाण आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.