Latest Marathi News

BREAKING NEWS

. अन्यथा मनसे स्टाइल आंदोलन करू, वसंत मोरे यांचा नेमका इशारा कोनाला ?

0

पुणे | महाराष्ट्रात बाहेरून येणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीच्या गुन्ह्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत अशीच एका घटनेला मनसे नेते वसंत मोरे यांनी वाचा फोडली आहे तसेच संबंधित कंपनीला इशारा सुद्धा दिला आहे. या संदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट सुद्धा लिहिली आहे. आमचे साहेब परप्रांतीयांविषयी बरोबरच बोलतात. अशी गुन्हेगारी प्रवृत्तीची माणसं सगळ्या परप्रांतीयांचं नाव खराब करतात. म्हणून आम्हाला आक्रमक भूमिका घ्यावी लागते. यापुढे कोणताही माणूस कंपनीमध्ये काम करण्यासाठी घेताना पूर्ण चाळूनच तुम्हाला घ्यावा लागेल. अन्यथा आम्ही मनसे स्टाईल आंदोलन करायला आताही कमी करणार नाही. असा इशारा मनसेचे आक्रमक नेते वसंत मोरे यांनी दिला आहे.

पुणे शहरात एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून मध्य प्रदेशात विकण्यात आल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आणि पीडित मुलीला तिच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले होते. हे प्रकरण घडल्यानंतर वसंत मोरे यांनी अनेकदा आरोपींची माहिती कंपनीकडे मागितली होती. मात्र कंपनीने उडवाउडवीचे उत्तर देऊन, टाळाटाळ केली होती. प्रकरण उघडकीस आल्यानंतर पाहिजे असलेली माहिती मोरे यांना पोलिसांकडून मिळाली. त्यानंतर मोरे यांनी थेट कंपनीमध्ये जाऊन संबंधित मॅनेजर व कर्मचारी यांना जाब विचारला.

परप्रांतीय नागरिकांना कामाला ठेवण्यापूर्वी त्यांची पूर्ण माहिती करून घेतली होती का? त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन केलं होतं का? असे प्रश्न मोरेंनी विचारले. सिक्युरिटीने कंपनीच्या गेटवरुन पीडित मुलीच्या आई-वडिलांना हाकलून दिलं होतं. हा सगळा प्रकार माझ्या भागात घडला आहे. म्हणून योग्य तो न्याय त्यांच्या कुटुंबियांना द्यावा नाही तर मनसे स्टाईल आंदोलन करू. जिथे गरज पडेल तिथे दांडा नक्की बाहेर काढू, असा इशारा मोरेंनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.