Latest Marathi News

BREAKING NEWS

श्रीकांत शिंदे यांचा ड्रायव्हर, भाजी आणणाऱ्याला सुरक्षा, पण… राऊत बंधूंची मुख्यमंत्र्यांवर टीका

0

ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगकडून संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यता आली आहे. जीवे मारण्याच्या धमकीचा मॅसेज संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला आहे. धमकीनंतर प्रथमच राऊत यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेऊन राज्य सरकारवर टीका केली आहे.

यावेळी आमदार सुनिल राऊत यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सुनिल राऊत यांनीच या धमकी प्रकरणात कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. चाळीस आमदारांना दोन दोन गाड्या मागे पुढे ठेवलेल्या आहेत. मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांचे काही ड्रायव्हर आहेत त्यांचा भाजी आणणारा माणूस आहे त्यांना देखील सुरक्षा दिली आहे, मात्र विरोधकांना वाऱ्यावर सोडले आहे, त्यांना सुरक्षा देण्यात आलेली नाही, असा घणाघात सुनिल राऊत यांनी केलाय.

आज मराठी माध्यमांशी बोलताना सुनिल राऊत यांनी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, ‘ काल संजय राऊत यांना लॉरेन्स बिश्नोई यांच्याकडून व्हाट्सअप मेसेज आला होता. Ak 47 याने दिल्लीला किंवा कुठेही मुसावालाला ज्याप्रकारे मारलं तसं तसं उडवू अशी धमकी संजय राऊत यांना आली होती. या संदर्भात कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

संजय राऊत यांना दारुच्या नशेत कुणीतरी मेसेज केल्याचं म्हटलं जातंय. यावरून सुनिल राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, ‘ दारूच्या नशेत फक्त संजय राऊत यांनाच कसे मेसेज येतात. महाराष्ट्रात भरपूर लोक आहेत भरपूर नेते आहेत पण. मग दारूच्या नशेत संजय राऊत यांनाच धमकीचा मेसेज जातो.’

Leave A Reply

Your email address will not be published.