Latest Marathi News

BREAKING NEWS

शरद पवार पोहोचले नितीन गडकरींच्या घरी,एकत्र केले जेवण

0

नागपूर | काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या मंत्र्यांनी राष्ट्रवादीचे अध्य्क्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्वरओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीची जोडरदार चर्चा रंगलेली दिसून आले होती अशातच आताआज नागपूरमध्ये शरद पवार हे भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी पोहोचले आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आजपासून दोन दिवस नागपूरच्या दौऱ्यावर आहे. आज सकाळीच त्यांचं नागपूर नागपूर विमानतळावर आगमन झाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे स्वागत केले. एका कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर शरद पवार हे नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी पोहोचले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांची बैठक सुरू आहे. यावेळी त्यांच्यासोबत अनिल देशमुखंही सोबत आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये विविध राजकीय आणि कृषी च्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच शरद पवार हे नितीन गडकरी यांच्या घरी जेवन करणार आहे.

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत आणि शिवसेना प्रतोद भरतशेठ गोगावले हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निवास्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर पोहोचले. अचानक शिवसेनेचे नेते सिल्व्हर ओकवर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

दोन्ही नेत्यांनी शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली. या भेटी वेळी प्राध्यापक प्रदीप ढवळ हे देखील उपस्थित होते. ही भेट कशा संदर्भात होती या संदर्भात कोणाताही खुलासा करण्यात आला नसल्यामुळे भेटीचे कारण गुलदस्त्यातच असल्याचं समजतंय. या तिन्ही नेत्यामध्ये कुठल्या मुद्यावर चर्चा झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.