Latest Marathi News

BREAKING NEWS

अंकिता हत्याकांड :रिसॉर्टमध्ये मुलींशी व्हायचे गैरवर्तन

0

उत्तराखंडमध्ये १९ वर्षीय अंकिता भंडारी या मुलीच्या हत्येनंतर रिसॉर्टमध्ये काम केलेल्या एका माजी कर्मचारी महिलेने खुलासा केला आहे. तिने सांगितले की, रिसॉर्टचा मालक पुलकित आर्य आणि अंकित गुप्ता हे मुलींशी गैरवर्तन करायचे.

ती मुलगी म्हणाली की, वनंतरा रिसॉर्टमध्ये मे महिन्यात नोकरी सुरू केली होती. जुलैमध्ये सोडून दिली. पुलकित आर्य आणि अंकित गुप्ता हे रिसॉर्टमध्ये मुलींना आणत. तिथे व्हीआयपी येत असत. डेहराडूनची रहिवासी असलेल्या मुलीने सांगितले की, मी तिथे रिसेप्शनिस्ट होते. माजी मंत्री विनोद आर्य यांचा मुलगा पुलकित आर्य हा मुलींसोबत गैरवर्तन करायचा. त्यांना शिवीगाळ करायचा. रिसॉर्टमध्ये संशयित मुले-मुली येत असत. पुलकित
रजिस्टरमध्ये त्यांची नोंद करू देत नसे . तिने सांगितले की, एकदा पुलकितची पत्नी रिसॉर्टला आली असताना तिने मला घरी कामाची ऑफर दिली होती. मला पतीपासून वेगळे करून त्याच्या खोलीत पाठविण्यास पुलिकतने कर्मचाऱ्यांना सांगितले होते. मी त्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर आम्ही दोघांनीही तेथील नोकरी सोडली.

Leave A Reply

Your email address will not be published.