Latest Marathi News

BREAKING NEWS

आता थापा मारणाऱ्यांकडे थापा सुद्धा राहिला नाहीये

0

पुन्हा एकदा सेनेने सामना अग्रलेखावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या शाखा म्हणजे चोवीस तास लोकांसाठी उघडी असलेली जनमंदिरेच आहेत. तितकीच ती न्यायाची मंदिरे आहेत. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही अशी टीका शिवसेनेने सामना अग्रलेखातून भाजपावर केली होती. त्याला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

आशिष शेलार म्हणाले की, ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली. अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले. ज्यांनी गणेशोत्सव, नवरात्रौत्सव बंद करायला लावले त्यांना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सावाची धूम सुरू आहे हे पाहून पोटात मळमळ होतेय. मुरड मारतेय म्हणून ते सामनातून जळजळ व्यक्त करत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय त्यांना आमचा एकच सल्ला मग घ्या ना धौती योग असा मार्मिक टोला शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

जेव्हा आम्ही उत्सव अशा थापा मारणाऱ्यांकडे आता ‘थापा’ पण राहिला नाही आणि उत्सवही नाही. यावेळी आम्ही उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन गर्वहरण केले. त्यावेळी मात्र जळजळ व्हायला लागली. लालबाग, परळ, शिवडीत मराठी दांडिया भाजपाने आयोजित केला त्याचा सामनाकारांना आणि पेग्विंग सेनेला एवढा त्रास का झाला? असा सवाल करत याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच असंही भाजपाने म्हटलं.

आता थापा मरणाऱ्यांकडे थापा सुद्धा राहिला नाहीये

Leave A Reply

Your email address will not be published.