Latest Marathi News

BREAKING NEWS

अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीतून भाजप उमेदवार मागे घेणार? भाजपाची महत्वपूर्ण बैठक

0

मुंबईत नाही तर महाराष्ट्रात सध्या अंधेरी पूर्व पोटनिवडणूक २०२२ ची चर्चा आहे. ३ नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होणार आहे. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले जात असून या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून या निवडणुकीत झुंजार नेते मुरजी पटेलयांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून स्व. आ. रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान,मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. त्यानंतर आता शिंदे गटाच्या आमदाराने देखील मुयख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून देण्याची मागणी केली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांची आज मुंबईत एक महत्वाची बैठक होत आहे. भाजप आमदार आणि मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर पोहोचले आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीच्या संदर्भात बैठक होत असल्याची माहिती आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करावी असे आव्हान भाजपला केले आहे. त्यामुळे आता उद्या अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल ही बैठकीसाठी पोहोचले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.