Latest Marathi News

BREAKING NEWS

तर मणिपूर फाईल्स बनवुन दाखवा, विवेक अग्निहोत्रींना नेटकऱ्याचं खुलं आव्हान

0

मुंबई|

सध्या मणिपूर धुमसतंय. मणिपूर मध्ये दोन महिलांना विवस्त्र करुन त्यांची धिंड काढण्यात आली. या सगळ्या वातावरणात अशातच काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निगहोत्री यांना मात्र नेटकऱ्यांनी घेरलं आहे.

विवेक अग्नीहोत्री यांनी काश्मिर फाईल्ससारखा सिनेमा बनवुन संपुर्ण जगाचं लक्ष त्यांच्याकडे वळवलं. हेच विवेक आता मणिपूर फाईल्स सिनेमा बनवणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी त्यांना विचारला आहे. बघुया काय घडलं. ‘द काश्मीर फाइल्स अनरिपोर्टेड’ या विषयाचा संदर्भ देत विवेक अग्निहोत्री यांनी ट्विट केले की, ‘काश्मिरी हिंदू नरसंहारावर भारतीय न्यायव्यवस्था आंधळी आणि मूक राहिली आहे. ते अयशस्वी ठरले आहे आणि अजूनही आपल्या संविधानात दिलेल्या वचनानुसार काश्मिरी हिंदूंच्या जगण्याच्या अधिकाराचे रक्षण करण्यात अपयशी ठरते.

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना एका ट्विटर युजरने कमेंट केली की, “वेळ वाया घालवू नका, जा आणि मणिपूर फाइल्स चित्रपट बनवा जर तुम्ही खरे माणूस असाल.”

Leave A Reply

Your email address will not be published.