Latest Marathi News

BREAKING NEWS

लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त चंद्रकांतदादांनी केले अभिवादन

0

पुणे |

भारतीयांच्या मनामनात स्वराज्याचा हुंकार भरणाऱ्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोथरूडमधील निवासस्थानी जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी भीमगर्जना करणारे आणि ब्रिटीशांच्या मनात धडकी भरवणाऱ्या लोकमान्य केशव अर्थात बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती आहे. द मॉर्डन मेकर ऑफ इंडिया अशा शब्दात खुद्द महात्मा गांधींनी ज्यांना सन्मानित केलं त्या खुद्द ब्रिटीशांनी ज्यांचा भारतीय असंतोषाचे जनक असा उल्लेख केला त्या थोर पत्रकार, स्वातंत्र्यसेनानी, निर्भिड वक्ता, प्रखर राष्ट्रवादी असणाऱ्या लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्त चंद्रकांत दादा पाटील यांनी अभिवादन केले. लोकमान्य टिळक यांची जयंती मोठ्या उत्साहात मध्ये साजरी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.