या वर्षीच पावसाळी अधिवेशनचा काल शेवटचा दिवस होता. तसेच हे अधिवेशन चांगलंच गजल होत त्यामुळे आता या वर्षीच हिवाळी अधिवेशन कधी होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. नागपूर मध्ये शेवटचं हिवाळी अधिवेश 2019 नंतर झालं होतं. त्यानंतर गेली दोन वर्ष कोरोना विषाणुने सगळीकडे थैमान घातलं होतं आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरला होऊ शकलं झाले नाही.
हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार-
मात्र या वर्षीच हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार असल्याचं समजतं आहे. एवढंच नाहीतर अधिवेशनाची तारीख सुद्धा ठरली आहे. सोमवार 19 डिसेंबर पासून सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे राज्याचं या वर्षीचं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. तसेच आतापर्यंत महाराष्ट्राची जवळपास सगळीच हिवाळी अधिवेशनं ही नागपूरला झाली आहेत, पण महाविकासआघाडी सरकार याला अपवाद ठरलं अशल्याचं सत्ताधारी म्हणत असल्याचं बोललं जात आहे.
नागपूर पॅक्टनुसार राज्यातलं तीन पैकी एक अधिवेशन नागपूरला घ्यावं लागतं, पण महाविकासआघाडी सरकारला 2019 नंतर नागपूरमध्ये अधिवेशन घेता आलं नाही. त्यावर्षीच अर्थसंकल्पीय हिवाळी अधिवेशन नागपूर पॅक्टचा सन्मान म्हणून नागपूरमध्ये घेण्याची मागणीही भाजपने केली होती. परंतू उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीमुळे त्यावेळी मुंबईमध्ये अधिवेशन पार पडलं होतं.