अजितदादांना पहाटे जाऊन शपथ घ्यायची सवय लागली आहे. त्यामुळं पहाटे जाऊन शपथ घेतल्यावर सरकार पडेल असं त्यांना वाटतंय. पण दादा पुढचे 15 वर्षे तुम्ही निवांत राहा असे म्हणत सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला.
तसेच अधिकाऱ्यांवर दबाव तंत्र वापरायची पवार फॅमिलीची जुनी सवय असल्याचेही पवार पाटील म्हणाले. शिवतीर्थावर काय शिवसेनेचा मेळावा आहे वाटले का? तिथे तर राष्ट्रवादीचाच मेळावा असेल. स्टेजवर फक्त आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब मार्गदर्शन करतील असेही पाटील म्हणाले.
आमदार शहाजीबापू पाटील यांनी अजित पवार यांच्यावर टोलेबाजी केल्याचे पाहायला मिळालं. दादा पुढचे 15 वर्षे तुम्ही निवांत राहा असे पाटील म्हणाले. दसरा मेळाव्याच्या मुद्यावरुन देखील शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला. शिवतिर्थावर गर्दी ही अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी गोळा केलेली असेल. स्टेजवर फक्त आमचे उद्धवसाहेब मार्गदर्शन करतील असेही पाटील म्हणाले. मात्र खरे वाघाच्या अवलादी असणारे शिवसैनिक बिकेसी मौदानावर असतील असेही शहाजीबापू पाटील म्हणाले.
अधिकाऱ्यांवर दबाव तंत्र वापरायची पवार फॅमिलीची जुनी सवय असल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले. पण त्यांच्या दबावाला कोणताही अधिकारी आता बळी पडणार नसल्याचे ते म्हणाले. दसरा मेळाव्याला गर्दी ही राष्ट्रवादी काँग्रेसची असणार आहे. खरे शिवसैनिक बिकेसी मैदानावर असणार आहेत. मुंबईची जनता ही सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे राहणार असल्याचे शहाजीबापू पाटील म्हणाले.