मुंबई |
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप झाला आहे. अनेक
राष्ट्रवादीचे नेते हे सरकार मध्ये सामील होत आहे.
राष्ट्रवादीच्या दिग्गज ३० नेते हे राजभवनावर दाखल
झाले आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची
शपथ घेण्याची शक्यता आहे. तर त्यांच्यासोबत आणखी
राष्ट्रवादीचे ९ आमदार हे शपथ घेणार असल्याची माहिती
आहे. दरम्यान, शरद पवारांचा या शपथविधीला पाठिंबा
नसल्याची माहिती आहे.
नाशिकमधून अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, प्रविण पवार, दिलीप बनकर, सरोज आहेर आणि माणिकराव कोकाटे हे आमदार अजित पवारांसोबत असणार आहेत.
काहीच वेळापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि जिल्हाप्रमुखांची बैठक बोलावली होती. यानंतर अजित पवारांनी विरोधीपक्षनेते पदाचा राजीनामा दिला आणि आता ते शपथ घेणार आहेत. थोड्याच वेळात शपथविधीचा सोहळा होणार आहे, यासाठी राजभवनात शिवसेना, भाजप यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते यायला सुरूवात झाली आहे.