मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून शिवसेनेसोबत काम करत असताना येणारे अनुभव सुखावणारे आहेत. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली शिवसेना भविष्यात अधिक यश मिळवेल तसंच महाराष्ट्राच्या जडणघडणीत योगदान देत राहील, असा विश्वास वाटतो, असं म्हणत अजित पवार यांनी फेसबुकवर शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्र शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्याच्या सत्तास्थानी असणारा शिवसेना पक्ष आज आपला ५४ वा वर्धापनदिन साजरा करत आहे. यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना वंदन ! महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत शिवसेनेचं महत्त्वाचं योगदान आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातला एक प्रमुख पक्ष आज, महाविकास आघाडीत आमच्यासोबत असल्याचा आनंद असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांना सोबत घेत १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना केली होती. आजवर शिवसेनेन अनेक चढउतार पहिले आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपसोबत युतीमध्ये असणारी शिवसेना आज कॉंग्रेस – राष्ट्रवादीसोबत महाआघाडी करत सत्तेतील प्रमुख पक्ष बनला आहे.
दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या राजकीय कारर्किदीत एकदाही निवडणूक लढवली नव्हती. त्यानतर आता उद्धव ठाकरेंची विधानपरिषदेवर बिनविरोध झाली आणि ते सुद्धा आमदार झाले. त्यामुळे ठाकरेंच्या घरात दोन व्यक्ती ते सुद्धा पितापुत्र एकाचवेळी विधीमंडळाचे सदस्य झाल्यानं ठाकरे घराण्यात एका वेगळ्याच इतिहासाची नोंद झाली आहे