Latest Marathi News

BREAKING NEWS

राजकारण, समाजकारणातला चांगला सहकारी गमावला – अजित पवार यांचा विनायकराव निम्हण यांच्या निधनानिमित्त शोक व्यक्त

0

पुणे |

“पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे माजी आमदार, राजकीय-सामाजिक क्षेत्रातील सहकारी श्री. विनायकराव निम्हण यांचे निधन हा सर्वांसाठी मोठा धक्का आहे. पुण्याच्या विकासात प्रदीर्घकाळ सोबत काम करणारा चांगला सहकारी आज गमावला आहे.

त्यांच्या आकस्मिक जाण्याचं दुःख मोठं आहे. हे दुःख सहन करण्याची शक्ती निम्हण कुटुंबीयांना आणि कार्यकर्त्यांना मिळो. श्री विनायकराव निम्हण यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विनायकराव निम्हण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Leave A Reply

Your email address will not be published.