जळगाव | राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषद आमदार एकनाथ खडसे यांनी अमित शाह यांच्या भेटीच्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं असून अमित शाह यांना फक्त मी नाही तर शरद पवारही भेटणार असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. मी अमित शहा यांच्या भेटीबाबत शरद पवारांना पूर्ण कल्पना दिली आहे. शरद पवारही माझ्यासोबत भेटीला अमित शाह यांच्या भेटीला येणार आहेत, असं खडसे म्हणाले आहेत.
रक्षाताईंनी मला सांगितलं अमित शहा यांच्या ऑफिस बाहेर तीन तास बसून ठेवलं. भेट झाली नाही, असं महाजन म्हणाले. याबाबत मी रक्षा खडसेंना विचारलं. महाजनांसोबत मी कुठलीही चर्चा केलेली नाही, असं रक्षा खडसेंनी सांगितल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितलं आहे. तसेच गिरीश महाजन यांना कुठल्याही मिटवण्याच्या विषयावर मी बोललो नाही, असं स्पष्टीकरण खडसे यांनी दिलं आहे.
पुढे बोलताना खडसे म्हणाले की, अफवांवर विश्वास ठेवू नका. मी कुठेही जाणार नाही. मी पन्नास खोके घेऊन कुठे जाणारा माणूस नाही, असं म्हणत खडसेंनी शिंदेगटालाही टोला लगावला आहे.जनतेला माझ्यावर विश्वास आहे. नाथाभाऊ हा पक्ष सोडणारा माणूस नाही. मी खोक्यावर विकणारा माणूस नाही. ज्या पक्षाने मला राजकीय प्रतिष्ठा परत मिळून दिली त्या पक्षाला त्याग करून जाईल, असं आता तरी कुठलं वातावरण नाही. मी असला फालतू विचारही कधी करणार नाही, असं म्हणत खडसेंनी पुन्हा भाजपत जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिलाय.