ठाकरे आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. ठाकरे गटाकडून शिवतीर्थावर ऐतिहासिक दसरा मेळावा भरवण्याची तयारी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही मुंबईतच दसरा मेळावा घेण्यासाठी कंबर कसली आहे. अशातच आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा नवा टीझर रिलीज करण्यात आला आहे
“छत्रपतींनी आपल्याला शिकवलं कोणाच्या पाठीत वार करायचा नाही आणि जर कोणी पाठीत वार केला तर त्याचा कोथळा बाहेर काढल्याशिवाय राहायचं नाही” असं म्हणत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा दमदार टीझर रिलीज करण्यात आला आहे. याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते गजानन काळे यांनी खोचक टोला लगावला आहे.
दसरा मेळाव्यावरून मनसेनेशिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “शिवतीर्थावरच्या टोमणे मेळाव्यासाठी मांडवली झाली म्हणे… मी तुझ्याकडे, तू माझ्याकडे गर्दी कर” असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच “दसरा मेळावा यशस्वी होण्यासाठी अबू आझमी आणि ओवेसीच्या शुभेच्छांची नवाब सेना प्रमुख यांना प्रतीक्षा” असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. मनसेचे नेते गजानन काळे यांनी खोचक टोला लगावला आहे.
शिवतीर्था वरच्या "टोमणे मेळाव्यासाठी" मांडवली झाली म्हणे …
मी तुझ्याकडे गर्दी करणार, तु माझ्याकडे गर्दी कर … 😂#शिल्लकसेना
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) October 3, 2022