शिंदे आणि ठाकरे गटात पक्ष बांधणी संघटन बांधणी वरून जोरदार घमासान सुरु असून एकमेकांवर आरोप प्रत्या रोपांमुळे दोन्ही गट चर्चेत आहेत. शिवाय शिवसेनेतून शिंदे गटात व इतर संघटना, पदाधिकारी हे प्रवेश करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच नाशिकमधून शिंदे गटाला महत्वपूर्ण पाठिंबा मिळाला आहे. आजवर कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसलेल्या छत्रपती सेनेने शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे नाशिकमधील शिवसेनेचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गटाचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या विविध ठिकाणी गाठीभेटी घेत असून अनेक संघटना संध्या शिंदे गटासोबत जोडल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर तीन दिवसांपूर्वी नाशिकला कार्यक्रमानिमित्त येऊन गेलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छत्रपती सेनेने भेट घेतली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन आणि पाठिंबा दर्शविण्यासाठी छत्रपती सेनेचे शिष्ट मंडळ मुंबईत भेटीसाठी गेले होते. दरम्यान भेटीनंतर छत्रपती सेनेने शिंदे गटाला पाठिंबा देत असल्याचे पत्रासहित काही अटी शर्तीवर वर पाठिंबा देत असल्याचे म्हटले आहे.नाशिकमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून छत्रपती सेना कार्यरत असून आजवर कोणत्याही राजकीय पक्ष वा व्यक्तीसोबत ही संघटना जोडली गेली नाही.
मात्र काही सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने संघटना मुख्यमंत्र्यांना जोडली गेली असल्याचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार यांनी सांगितले. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यात खऱ्या अर्थाने प्रगती व विकास घडेल असे चित्र मुख्यमंत्री झाल्यानंतर निर्माण झाले असून ते सत्यात उतरेल अशी आशा असल्याने हा निर्णय घेतल्याचे म्हणाले