मुंबई : कोरोना विषाणूचा एक रुग्ण चार आठवड्यांच्या कोमानंतर आणि 85 दिवस व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर बारा होत आहे. ही 57 वर्षीय व्यक्ती आता हळू हळू बरी होत आहे. तीव्र तापाने ग्रस्त झाल्यानंतर त्यांना सुमारे 4 महिन्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
wthr.com च्या वृत्तानुसार अमेरिकेच्या लुझियानामध्ये राहणाऱ्या कोरोना रूग्णाचे नाव रॉबर्ट लारा आहे. रॉबर्टची पत्नी बर्डी लारा श्वसन चिकित्सक आहे. रॉबर्ट आजारी पडण्यापूर्वी त्याची पत्नी कोरोना विषाणूच्या रुग्णांवर उपचार करायची.
पत्नी बर्डी लारा म्हणते – ‘तो दररोज खूप कठीण लढा देत आहे. त्याच्या उजव्या बाजूच्या फुफ्फुसाला नुकसान झाले आहे. त्यांना फुफ्फुसांच्या प्रत्यारोपणाची आवश्यकता आहे. रॉबर्ट लाराला कोरोना होण्यापूर्वी तो निरोगी होता. तथापि,उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी औषधे घेत होता.
रॉबर्ट लारा कोमातून बाहेर आले आहेत आणि आता चालणे, खाणे आणि हातांचा वापर करणे शिकत आहेत. त्यांना लवकरच घरी पाठवले जाईल. तथापि, व्हेंटिलेटरवर बर्याेच दिवसांपासून राहणारे रुग्ण बर्यारचदा बरा होण्यासाठी बराच वेळ घेतात.
रॉबर्ट लारा म्हणतात- ‘कोरोना व्हायरस मला मारू इच्छित होता. पण आता मी ठीक आहे. कारण मी हरलेलो नाही. ते म्हणाले की कोरोनाला हलक्यात घेऊ नका, यामुळे तुम्हाला अनेक प्रकारे त्रास होतो.