Latest Marathi News

BREAKING NEWS

‘आदित्य ठाकरेंच्या दापोलीतील मेळाव्याला राष्ट्रवादीची गर्दी

0

 

शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेना नेते रामदास कदम यांनी सुद्धा शिंदे गटात सामील होऊन थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता त्या पाठोपाठ त्यांचे सुपुत्र योगेश कदम यांनी सुद्धा आता मंत्री आदित्य ठाकरे यांना लक्ष करत विरोधात बसलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर घणाघाती टीका केली आहे.

आमदार योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंच्या दापोलीlतील मेळाव्याला राष्ट्रवादीची गर्दी जमली होती, असं म्हणत निशाणा साधला. शिंदे गटातील आमदार योगेश कदमांनी आदित्य ठाकरेंच्या निष्ठा यात्रेवर हल्लाबोल करत टोला लगावला. दीड ते दोन हजार जमा करुन शिवसेना वाढणार नाही, असं म्हणत योगेश कदम यांनी आदित्य ठाकरे यांना डिवचलं.

दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या आरोपांना आणि टीकेला उत्तर देणार असल्याचंही ते म्हणाले. १८ तारखेला मेळावा घेऊन सगळ्यांना उत्तर देऊ, असा इशारा योगेश कदम यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचाच उमेदवार हवा होता, मग मला तिकीट का दिलं, असा सवालही योगेश कदम यांनी आदित्य ठाकरे यांना उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.