उस्मानाबाद । अधिक मास महिना असल्यामुळे तुळजा भवानीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी वाढली आहे असून याच फायदा घेत भक्तांच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट वाढला आहे.सध्या भाविकांच्या याच गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भक्तांच्या खिशावर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. भाविकांना थोडा थोडका नव्हे लाखात डल्ला मारण्यात आला आहे.
या डल्ल्यामुळे चोरट्यांची तर दिवाळी साजरी होणार मात्र भाविकांचं दिवाळं निघणार आहे. चोरट्यांनी मंदिरातच चोरी केल्यामुळे मंदिरातील सुरक्षाव्यवस्था किती चोख आहे हे या वरुन दिसुन येते अशी प्रतिकिया दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दिली. तर दुसरीकडे तुळजा भवानी मंदिर प्रशासनावर भाविकांनी संताप व्यक्त केला आहे .
पोलिसांकडून उपलब्ध माहितीनुसार, किशोर प्रकाश खोपडे यांना मंदिरात चोरट्यांकडून लुटण्यात आले. तुळजा भवानी मंदिरातील निंबाळकर दरवाज्यामध्ये किशोर खोपडे यांच्या गळयातील १९ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तसेच संजयकुमार नामदेवराव शिवपुरे यांचे खिश्यातील रोख रक्कम ऐंशी हजार रुपये असे एकुण १ लाख २५ हजार रुपये हे दि. १३ ऑगस्ट २०२३ रोजी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशी तक्रार किशोर खोपडे यांनी तुळजापुर पोलीस ठाणे येथे दिली
या तक्रारीनंतर. त्या प्रमाणे अज्ञात व्यक्ती विरोधात भारतीय दंड विधान संहिता कलम- ३७९ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास गुरुनाथ लोखंडे हे करत आहे.तर दुसरीकडे तुळजा भवानीच्या संरक्षणासाठी तसेच भक्तांच्या संरक्षणासाठी मंदिरातच पोलीस चौकी आहे. तसेच मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सुरक्षेसाठी खाजगी सुरक्षारक्षक सुध्दा ठेवले आहेत. इतकी चोख व्यवस्था असताना चोरी होते कशी असा सवाल आता उपस्थित होत आहे.
या सरकारन ‘मुखवटे’ चढवून स्वतःला देशभक्त भासवायचे आणि…..!
ध्वजारोहणानंतर पीएम मोदींनी लाल किल्ल्यावरून बोलताना मणिपूरचा उल्लेख